वेंगुर्ला हायस्कूलला संगणक संच प्रदान

वेंगुर्ला हायस्कूलला संगणक संच प्रदान

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला हायस्कूलला संगणक संच प्रदान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने वेंगुर्ला हायस्कूलला दोन संगणक संच भेट देण्यात आले. यासाठीचे आर्थिक सहाय्य कुडाळ येथील शामराव सामंत यांनी रोटरी क्लबला केले.
संगणक संच हे रोटरी ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रेसिडेंड आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.प्रशांत कोलते, विद्यमान अध्यक्ष अॅड.प्रथमेश नाईक, दीपक ठाकूर, संजय पुनाळेकर, दादा साळगावकर, डॉ.विद्याधर तायशेटे, अनमोल गिरप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, पंकज शिरसाट, शाळा व्यवस्थापन समितीचे स्वप्निल रावळ, नितीन बांदेकर यांच्यासह रोटरीचे सदस्य, पालक, शिक्षक उपस्थित होते. भविष्यात आवश्यकतेनुसार वेंगुर्ला हायस्कूलला संगणक उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन रोटरी क्लबतर्फे देण्यात आले. या उपक्रमासाठी सन २०२५-२६चे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर आणि सचिव राजेश्वर उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!