*कोंकण एक्सप्रेस*
*साळशीतील पोस्ट कार्यालयाचे ग्रा.पं. मध्ये स्थलांतर*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी येथील शाखा डाक घर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीत स्थलांतरित करण्यात आल्यामुळे सर्वाना सोईस्कर ठरणार आहे.
यापूर्वी हे शाखा डाक घर गेली 45 वर्षे अनिल गावकर यांच्या घरात कार्यरत होते. आता हे पोस्ट कार्यालय साळशी ग्रामपंचायत इमारती मध्ये कार्यरत झाले असून यापूर्वी गेली अनेक वर्ष ग्रामस्थांची पोस्ट कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असावे. यासाठी मागणी होती त्याची पूर्तता ग्रामपंचायत कडून करण्यात आलेली आहे. हे कार्यालय आता साळशी येथे श्री पावणाई देवी मंदिर समोर एसटी स्टॉप पासून जवळच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित झाल्यामुळे तसेच गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यामुळे सर्वांना सोयीचे ठरणार आहे. याबाबत ग्रामस्थांना मध्ये समाधान व्यक्त होत असून ग्रामपंचायतने केलेल्या या सोयी बद्दल पोस्ट संबंधित सर्व कामे तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील विविध कामे Krwa छताखाली आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

