डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन स्पर्धेत कनेडी हायस्कूलच्या गौरांग सावंत याला सुवर्णपदक

डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन स्पर्धेत कनेडी हायस्कूलच्या गौरांग सावंत याला सुवर्णपदक

*कोंकण एक्सप्रेस*

*डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन स्पर्धेत कनेडी हायस्कूलच्या गौरांग सावंत याला सुवर्णपदक*

*कणकवली ःप्रतिनिधि*

ॠग्वेद हेल्थ बारामती फाऊंडेशन या भारत सरकारमान्य संस्थेमार्फत 2025-26 या वर्षात घेतलेल्या डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन ( डिटीएसई) परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा आठवीतील विद्यार्थी गौरांग अरविंद सावंत याला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.
ॠग्वेद हेल्थ बारामती फाऊंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण, संस्कार या क्षेत्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी यासाठी शासनमान्य संस्थांच्या सहकार्याने संस्था डिटीएसई हा प्रकल्प राबवत आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेच्या गौरांग सावंत याने या परीक्षेत सुवर्ण पदक तर याच प्रशालेची सहावीतील आर्या उमेश सापळे हिने उत्तेजनार्थ श्रेणी मिळविली आहे. लवकरच संस्थेमार्फत प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पदक देवून या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल गौरांग सावंत व आर्या उमेश सापळे यांचे कनेडी प्रशाला संस्था पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी वर्गातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!