प्रकाश मिस्त्री यांचे निधन

प्रकाश मिस्त्री यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रकाश मिस्त्री यांचे निधन*

*कणकवली : प्रतिनिधि*

कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील वरचीवाडी येथे राहणारे प्रकाश सिताराम मेस्त्री यांचे नुकतेच निधन झाले. ते काही महिने आजारी होते. वयाच्या 72 व्या वर्षी घरीच त्यांचे निधन झाले. कोंडये वरची वाडी स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाश मेस्त्री हे मुंबईत गिरणी कामगार होते. गिरण्यांच्या संपानंतर ते गावी आले होते. ते भजनी बुवा होते. गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावयी ,नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.गावचे माजी पोलीस पाटील संदेश मेस्त्री यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!