मणेरीत प्रचार रंगात; सोनिया नाईक यांच्या विजयाच्या चर्चा जोरात..!

मणेरीत प्रचार रंगात; सोनिया नाईक यांच्या विजयाच्या चर्चा जोरात..!

*कोंकण एक्सप्रेस*

*मणेरीत प्रचार रंगात; सोनिया नाईक यांच्या विजयाच्या चर्चा जोरात..!*

*दोडामार्ग: शुभम गवस*

मणेरी मतदार संघात सोनिया नाईक यांनी दमदार एन्ट्री करत प्रचाराला वेग दिला आहे. मणेरीत सुरू असलेल्या त्यांच्या प्रचारामुळे मतदार संघात विजयाच्या चर्चांना उधाण आले असून आज मणेरी गावातून त्यांच्या प्रचार सभेला उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.
राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. नव्या चेहऱ्याचा प्रभाव मतदारांवर कितपत पडेल आणि घरातून मिळालेला राजकीय वारसा किती सक्षमपणे पुढे नेता येईल, हे काळच ठरवत असतो. सध्या मणेरी मतदार संघात चर्चेत असलेल्या सोनिया नाईक या सक्रिय प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रचार मोहिमेत त्यांचे पती देखील खांद्याला खांदा लावून सहभागी झाले असून, हा विजय अस्तित्वाचा लढा मानत दोघेही अहोरात्र मेहनत घेत आहेत.
कळणे, सासोली, पाटये, कुडासे, भरपाल, पणतुर्ली, वानोशी आणि परमे ही गावे माटणे पंचायत समिती मतदार संघात समाविष्ट आहेत. या सर्व गावांमध्ये सोनिया नाईक यांनी प्रभावी नियोजन करत प्रचार सभा, घरभेटी आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता राजकीय वर्तुळात त्यांच्या विजयाची शक्यता बळावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!