*कोंकण एक्सप्रेस*
*दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे वितरण:कट्टा मध्ये उपक्रम*
*रोटरी क्लब सेंट्रल कणकवली व 1985 चे माजी विद्यार्थी यांच्या पुढाकारातून*
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(संयुक्त) कट्टा ही ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा असून या प्रशालेतून ज्ञानार्जन केलेले विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले नाव कमावले आहे म्हणून असे म्हणता येईल की वराडकर हायस्कूलचे विद्यार्थी हे हिऱ्याप्रमाणे तेजस्वी आहेत असे गौवरोद्गार ॲड. राजेंद्र रावराणे रोटरी क्लब सेंट्रल कणकवली चे अध्यक्ष यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात काढले.
कार्यक्रमाच्या औचित्य साधून रोटरी क्लब सेंट्रल कणकवली व प्रशालेतील 1985 च्या माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम निवड आणि करिअर गायडन्स या संदर्भात मार्गदर्शन तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयडिअल स्टडी ॲप चे मोफत वितरण केले गेले.
या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता ही वाढवावी व प्रशालेचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवावे ही अपेक्षा व्यक्त करताना प्रशालेचे माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध वकील ॲड.दीपक अंधारी
यांनी वाणिज्य शाखेतील तसेच विधी विषयक शिक्षणा मधील करिअरच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच श्री सचिन मदने (असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब कणकवली सेंट्रल) सौ मेघा गांगण (माजी अध्यक्ष,रोटरी क्लब)यांनी आपले बहुमोल असे विचार व्यक्त केले. यावेळी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सौ. प्रज्ञा प्रभाकर करावडे (सिनिअर कोर्डिनेटर ,कोटक एज्युकेशन फाऊंडेशन,मुंबई)यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रशालेचा इतिहास मांडला असताना कालचे व आजचे विद्यार्थी व उपलब्ध मार्गदर्शनपर माध्यमे यांच्या विषयी मार्गदर्शन केले. आजच्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या संधी व गुणवत्ता विषयी रोटरी क्लब कणकवली सेंट्रल च्या सचिव सौ सुप्रिया नलावडे यांनी विज्ञान शाखेमधील करिअरच्या संधीबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचा सपत्नीक सत्कार मुख्याध्यापिका सौ.देवयानी धनंजय गावडे पर्यवेक्षक श्री महेश विठ्ठल भाट यांच्या हस्ते .श्री सचिन मदने, प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.सुभाष गावडे,श्री प्रवीण गाड, सौ.पोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा च्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई उपस्थित होत्या.मुख्याध्यापिका सौ.देवयानी धनंजय गावडे यांनीही प्रशालेबद्दल असणाऱ्या सहकार्याबद्दल 1985 च्या माजी विद्यार्थी तसेच रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वीणा शिरोडकर यांनी केले.