*कोंकण एक्सप्रेस
*राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू*
*जिल्हा परिषदेवर भर पावसात एक दिवशीयलक्षवेधी आंदोलन*
*सिधुदुर्गनगरी*
राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे १४मार्च २४च्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेतील समायोजन अदयाप न केल्याने व इतर न्याय मागण्याबाबत विलंब होत असल्याने १९ ऑगस्ट ते २२ऑगस्ट २५ या चार दिवसांचे कामबंद आंदोलन करीत जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी एकदिवशीय आंदोलन केलेयावेळी संघटनेचेहेमंत पाताडे अशोक मोहिते अमित गावडे संदीप परब युवराज गरुड विशाल पोळ गिरीश चिपळूणकर ओंकार पालव प्रथमेश चव्हाण महादेव शेटे दिनकर पेडणेकर आदींसह आरोग्य अभियान मधील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते
यावेळी दिलेल्या निवेदनात१० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन सरळ सेवेतील समायोजनचा शासन निर्णय बैठक २८२३/प्र.क्र.४३०/आरोग्य-७ दिनांक १४ मार्च, २०२४ रोजी झालेला असुन दिड वर्ष उलटुनही अंबलबजावणी करणेस विलंब होत आहे. वर्ग-४ कडील वाहन चालक व सपोर्ट स्टाफ पदांचे समायोजन झालेले असुन वर्ग-३ च्या पदांचे समायोजनास प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, यांनी तात्काळ अंबलबजावणी करणे. दरमहा मिळणारे मासिक वेतन विलंबाने होत असलेबाबत.सन २०२४-२५ व २०२५-२६ ची मासिक वेतनवाढ व लॉयल्टी बोनस मंजुर असुन अदा करण्यात यावे.. १० वर्षा आतील एनएचएम अधिकारी-कर्मचारी यांना बदली धोरण लागु करावे. . सर्व एनएचएम अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफची योजना व गट विमा लागु करण्यात यावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या कर्मच्याऱ्यांचे कामकाज कौशल्य, प्रदिर्घ अनुभव याचा विचार करुन तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या विशेष प्रयत्नांतुन समायोजनचा शासन निर्णय दिनांक : १४ मार्च, २०२४ रोजी झालेला असुन आम्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास, नगर विकास, व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील समकक्ष रिक्त पदावर किंवा समकक्ष रिक्त पद उपलब्ध नसल्यास शैक्षणिक अहर्ता नुसार नियमित करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे यास अनुसरून दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी वाहन चालक ३१ पदे व दि.०२ जानेवारी २०२५ रोजी सपोर्ट स्टाफ गट ड ३४४ पदांचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. या नुसार पुढील गट क संर्वगाच्या नियमित पदांच्या समकक्ष व शैक्षणिक अहर्ता नुसार समकक्ष कार्यरत तांत्रिक व अतांत्रिक पदांची अंतिम सेवाजेष्ठतेच्या यादीसह ७१ संवर्गाची माहिती राज्य शासनास सादर झालेली असुन नियुक्ती आदेश देणेबाकी आहे. असे असतानाही मा. आरोग्य मंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी नियमित पदभरती सुरुच ठेवून समायोजनाबाबत चालढकल करुन आम्हा कर्मच्याऱ्यांचा अंत पाहत आहेत.
. महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या विधिमंडळाच्या २०२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुददा क्र.५२ नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना सरळ सेवेत समायोजनाने नियमित करण्याचा निर्णय घेतला असुन त्याना आरोग्य सेवेतील समकक्ष पदांवर सामावुन घेण्याचा निर्णय होवुनही सरकारने आजअखेर अंमलबजावणी केलेली नाही.
आम्ही कार्यरत अधिकारी व कर्मचारी अल्प मानधनात काम करत असुन आमच्या कुटुंबाचा उदनिर्वाह याच मानधनातुन होतो. एकीकडे समायोजनाचा शासन निर्णय झालेला असतानाही आरोग्य विभागच्या पदांशी निगडीत सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व नगरविकास विभाग या विभागाकडील पदभरती सुरु असुन हि पदभरती एकवेळचे समायोजन केल्यानंतर करण्यात यावी. आम्हा अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारी वार्षिक वेतनवाढ व लॉयल्टी बोनस मागील वर्षापासुन दिलेला नाही. याबाबत आयुक्त कार्यालयाशी पाठपुरावा करुनही दुर्लक्षित केले जात आहे. समुदाय आरोग्य अधिकारी याच्या बदली धोरणाच्या आधारे आम्हा एनएचएम कर्मचारी यांना एकवेळचे बदली धोरण लागु करावे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफची योजना व गट विमा लागु करण्यात यावा.
वरील प्रलंबित मागण्या व समायोजनबाबत आरोग्य मंत्री, व शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुन हि चालढकल केली जात आहे. कोवीड १९ सारख्या अत्यंत महाभयंकर आजाराच्या वेळी जो कर्मचारी आपल्या घराबाहेर पडुन जनतेला आरोग्य सेवा पुरवित होता त्याच आरोग्य कर्मच्याऱ्यावर आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान एककीकरण समिती, महाराष्ट्र राज्य, दि. १९ऑगस्ट पासुन बेमुदत कामबंद आदोलन करणार आहेत. तथापि, सिंधुदूर्ग जिल्हात गणेशउत्सव हा महत्वाचा सण असुन गणेशभक्त परगावाहून जिल्हात येणार आहेत. यावेळी त्यांना आरोग्य सेवा मिळावी व आरोग्य यंत्रणेवर ताण येवु नये याकरीता आम्ही सिंधुदूर्ग जिल्हातील राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी दि. १९ ऑगस्ट ते २२ऑगस्ट २५ या चार दिवसांचे लक्षवेध कामबंद आंदोलनास जिल्हा परीषद, सिंधुदूर्ग समोर आमच्या वरील न्याय मागण्या करीता आंदोलनास बसणार आहोत.
, आमच्या भावना, वेदना, अडचणी, समस्या जाणुन समायोजन व प्रलंबित मागण्या बाबत राज्याचे. मुख्यमंत्री , मआरोग्य मंत्री व . पालकमंत्री, तसेच प्रशासनाच्या निर्देशास आणुन देवुन लवकरात लवकर न्याय मिळुन दयावाअशी मागणी केली आहे सोबत फोटो
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर भर पावसात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व कामबंद आंदोलन सुरू केले आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी