*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते*
*ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका)*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. या ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना होणार आहे. तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.5 वाजता असल्यामुळे इतर कार्यालये आणि संस्थांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.35 च्या पुर्वी किंवा सकाळी 9.35 नंतर करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000