*कोंकण एक्सप्रेस*
*आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचे वितरण*
*वेंगुला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला तालुक्यातील परूळेबाजार व मेढा ग्रामपंचायत अधिकारी शरद शिदे तसेच केळुस ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर यांचा यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरीबद्दल व राज्यस्तर, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी.पी.राधाकृष्णन व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम व प्रधानसचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला तालुक्यातील परूळेबाजार व मेढा ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांना सन २०२२-२०२३ चा शासन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. तर केळुस ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर यांना सन २०२३-२०२४ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन्ही अधिकारी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्याने त्यांचे जिल्ह्यासह तालुकास्तरावरून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जिल्हापरिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायत अधिकारी यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. कोकण विभागातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी दोन्ही अधिका-यांचे खास कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – परूळेबाजार व मेढा ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे तसेच केळुस ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर यांना आदर्श अधिकारी पुरस्कार देण्यात आले.

