*बिडवलकर प्रकरणातील आरोपी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार*

*बिडवलकर प्रकरणातील आरोपी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार*

*कोंकण एक्सप्रेस*

*बिडवलकर प्रकरणातील आरोपी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार*

*कुडाळ : प्रतिनिधि*

कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील सिध्देश अशोक शिरसाट वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ याचेविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारु वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहीती उपलब्ध झाल्याने त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होती. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांनी घेवुन त्यात सिद्धेश शिरसाट या सराईत गुन्हेगारास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे, या करीता तात्कालीन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिलेले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील सिध्देश अशोक शिरसाट वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ याचेविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारु वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहीती उपलब्ध झाल्याने त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता अहवाल मा. उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचेकडे पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार सराईत गुन्हेगार सिध्देश अशोक शिरसाट वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ याचे हददपारीचे प्रकरणाची सुनावणी मा. उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांनी घेवुन त्यात वरील नमुद सराईत गुन्हेगार यास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत

वरील गुन्हेगार हा सध्या निवती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी येथील कारागृहामध्ये आहे. तो न्यायालयीन कोठडीतुन बाहेर येताच त्यास सदर हद्दपारीचे आदेशाची त्वरीत बजावणी करुन उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचे आदेशान्वये त्यास सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हददपार करण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्याकडून करण्यात येणार आहे. भविष्यात सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन अशा गुन्हेगारांना सिंधुदुर्ग जिल्हयातुन हददपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई ही तात्कालीन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांवळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम पोलीस अंमलदार, प्रितम कदम, कृष्णा केसरकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आईर यांनी केलेली आहे.

कुडाळ पोलीस ठाणे अभिलेखावर ज्या इसमांवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध बाबतचे गुन्हे दाखल आहेत व त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही अशा गुन्हेगारांचे अभिलेखाचे पडताळणी करून नमूद इसमांवर अशाप्रकारे कारवाई करण्याचे सातत्य ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!