अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात मालवणच्या तहसीलदार ऍक्शन मोडवर..

अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात मालवणच्या तहसीलदार ऍक्शन मोडवर..

*कोंकण एक्सप्रेस*

*अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात मालवणच्या तहसीलदार ऍक्शन मोडवर…*

*सात डंपर घेतले ताब्यातः महसूल व पोलीस पथकाने केली कारवाई..*

*मालवण ः प्रतिनिधी*

अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात ऍक्शन मोडवर आलेल्या मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गावर सायंकाळी एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले.

मालवण च्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली. विना पास वाळू वाहतूक करणारे सहा डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. तर करवाईच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करणारा गोवा पासिंगचा एक डंपर सागरी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कलंडला होता. तोही ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच दोन डंपर चालकांनी महामार्गावर वाळू ओतली व ते पळून गेले. अशी माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली.

खाडीपात्रात वाळू उपसा टेंडर दिली असतानाही अनधिकृत पणे विनापरवाना वाळू वाहतूक करणारे हे सर्व डंपर असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहितीही तहसीलदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!