*कोंकण एक्सप्रेस*
*तरेळे – वाघाचीवाडी येथे २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा*
*शिरगाव | संतोष साळसकर*
सुतळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून शनिवारी २२ मार्च रोजी ही स्पर्धा तळेरे वाघाचीवाडी येथील श्री. शेवरादेवी कबड्डी मैदान येथे होणार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता शहीद कै. रविंद्र गंगाराम जगताप प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर सायंकाळी ४ वा. पासून जिल्ह्यातील नामवंत १६ संघांचा सहभाग असलेली भव्य कबड्डी स्पर्धा होणार असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला रोख रू. ११ हजार १११ , उपविजेत्या संघाला ७ हजार ७७७ तर तृतीय आणि चतुर्थ संघाला प्रत्येकी ३ हजार ३३३ व प्रत्येक संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई आणि अष्टपैलू खेळाडू यांना प्रत्येकी रु. ५०१ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या दोन्हीही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शेवरादेवी कला, क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

