*कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती*

*कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती*

*कोंकण एक्सप्रेस*

*कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती*

*कणकवली -वार्ताहर*

भिरवंडे गावचे सुपुत्र, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे कायदा सल्लागार प्रतिथयश वकील मिलिंद सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मिलिंद सावंत हे कणकवली शहरात गेली १८ वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुका न्यायालय व जिल्हा न्यायालयामध्ये देखील त्यांनी आपला वकिली व्यवसाय केला आहे. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून मिलिंद सावंत यांची विशेष ओळख आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. मिलिंद सावंत यांचे अभिनंदन केले जात आहे.

या त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्या बद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री.सतीश सावंत, सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत, सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्वे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!