नांदगाव मधलीवाडी येथे जि.प. व खाजगी अनुदानित शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण वर्ग’ संपन्न

नांदगाव मधलीवाडी येथे जि.प. व खाजगी अनुदानित शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण वर्ग’ संपन्न

कोंकण एक्सप्रेस 

नांदगाव मधलीवाडी येथे जि.प. व खाजगी अनुदानित शिक्षकांचे ‘शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण वर्ग’ संपन्न

53 शिक्षकांचा सहभाग

कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले

जि प व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीचे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 नांदगाव मधलीवाडी जि.प. पुर्ण प्राथमिक शाळेतील सभागृहात 24 फेब्रुवारी ते 1मार्च या कालावधीत संपन्न झाले.
या प्रशिक्षणवर्गाला खारेपाटण, शेर्पे,चिंचवली,कुरंगवणे,शिडवणे वारगाव,नडगिवे,साळिस्ते,तळेरे, कासार्डे,पियाळी,ओझरम,दारूम,नांदगाव यांच्यासह इतर उच्च प्राथमिक,माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील 53 शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये 19 महिला शिक्षिका तर 34 पुरुष शिक्षकांचा सहभाग होता.
उद्घाटन प्रसंगी नांदगाव मधलीवाडी शाळेच्या च्या मुख्याध्यापिका सौ.श्रावणी जावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे विशेषतज्ञ नितेश तेली, सुलभक तथा तज्ञ मार्गदर्शक व्ही.पी. राठोड( फोंडाघाट हायस्कूल),एल.के. हर्याण (खारेपाटण हायस्कूल),सौ.व्ही.व्ही. मुद्राळे(कासार्डे हायस्कूल),तसेच इतर जेष्ठ शिक्षक, मुख्याध्यापक,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे तसेच तज्ञशिक्षकांचे स्वागत नितेश तेली पुष्पगुच्छ यांनी केले.


या प्रशिक्षणात व्ही.पी.राठोड यांनी एन ई पी 2020, SQAAF ,सीबीए -3, एचपीसी-1 व गटकार्य,आदी घटकांवर तर एल.के.हर्याण यांनी एससीए,सीबीए-2, व सीबीए-5,एचपीसी-2,व गटकार्य तर तिसरे तज्ञ मार्गदर्शक सौ.व्ही.व्ही.मुद्राळे यांनी एससीए,सीबीए-2, व सीबीए-4,सीबीए6,गटकार्य,काहुत चाचणी तसेच SQAAF या घटकांवर पाच दिवस अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
समारोप समारंभात कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.व्ही.राणे, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,नांदगाव हायस्कूलचे श्रीकांत सावंत, खारेपाटण उर्दूच्या नजमी मुल्ला,शेर्पे जि.प. प्राथ- शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य पुरस्कार विजेते दशरथ शिंगारे,खारेपाटण हायस्कूलच्या शिक्षिका श्रीम.प्राजक्ता कोकाटे आदींनी मनोगत व्यक्त करुन प्रशिक्षण कालावधीतील अनुभव कथन केले.समारोप प्रसंगी व्यासपीठावर नांदगाव मधलीवाडी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख नितेश तेली,या प्रशिक्षण वर्गाचे सुलभक व्ही.पी.राठोड,एल.के हर्याण व सौ व्ही.व्ही.मुद्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधीत अजित गोसावी यांच्या सुमधुर गीत गायनाने तसेच नजमी मुल्ला यांच्या शेरोशायरीने सर्वाचे विशेष लक्ष वेधले गेले.प्रशिक्षणार्थ्यी अजय गुरसाळे यांनी आभार मानून प्रशिक्षण वर्गाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!