8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त कणकवली नगरपंचायत, कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त कणकवली नगरपंचायत, कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

कोंकण एक्सप्रेस 

8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त कणकवली नगरपंचायत, कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

कणकवली : प्रतिनिधि 

8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त कणकवली नगरपंचायत, कनकसिंधू शहर स्तर संघ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.8 मार्च सकाळी 9.00 ते 1.00 या वेळेत कणकवली नगरपंचायत हॉल येथे महिला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या शिबिरात रक्तदान करणाऱ्या महिला रक्तदात्याचा महिला दिननिमित्त विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तरी आपल्या पैकी किंवा आपल्या कुटुंबातील किंवा ओळखीत रक्तदान करू शकतील अश्या युवती /महिला यांना यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे व इच्छुकांची नावे
मकरंद सावंत – 94203 06048, सुशील परब – 82753 90900 अमोल भोगले – 9421235586, सुहासिनी कुलकर्णी – 86007 65458, स्नेहल हजारें -93568 12161 शुभांगी उबाळे – 90757 37171 यांच्या जवळ कळवावी .
जागर स्त्री शक्तीचा # संकल्प रक्तदानचा
मग करताय न रक्तदान…..

⛑ रक्तदानाचे असे फायदे जे पाहून तुम्हाला नियमित रक्तदान करावेसे वाटेल ! ⛑
____________

रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? जे बरोबर देखील आहे. आजच्या ह्या स्वार्थी जगात का म्हणून आपलं रक्त कोणाला असं फ्री मध्ये वाटत फिरायचं, त्याचा आपल्याला पण काही फायदा नको का व्हायला?
म्हणूनच आज आम्ही आपल्याला रक्तदानाचे काही असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल.

रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो. Loyola University Health System Blood Bank चे संचालक Phillip De Christopher ह्यांनी सांगितले की, इतर लोकांच्या तुलनेत नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.

शरीरातील कॅलरीज कमी होतात :
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील, नाही का?

फ्री चेक-अप :
रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळते ते ही फ्री.

शरीरात Iron चे योग्य प्रमाण नियमित राखले जाते :
आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!