शंभूराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारा “छावा” चित्रपट विद्यार्थ्यांना पाहता येणारा मोफत

शंभूराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारा “छावा” चित्रपट विद्यार्थ्यांना पाहता येणारा मोफत

*कोंकण एक्सप्रेस*

*शंभूराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारा “छावा” चित्रपट विद्यार्थ्यांना पाहता येणारा मोफत*

*शिवजयंती निमित्त उद्योजक केदार झाड यांचा अनोखा उपक्रम; देवबागच्या मत्स्यगंधा चित्रपटात दोन शो चे आयोजन*

*मालवण : प्रतिनिधी*

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शंभूराजांचा धगधगता इतिहास दाखवण्यात आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हाच चित्रपट येत्या शिवजयंतीला शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाहायला मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांचा धगधगता आणि ज्वाज्वल्य इतिहास समजावा या हेतूने मालवण वायरी मधील उद्योजक केदार मिलिंद झाड यांच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर येथे हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या शोची वेळ सकाळी ८.३०, दुसऱ्या शोची वेळ सकाळी ११.०० असणार आहे. चित्रपट विहित वेळेत सुरू होणार आहे. चित्रपटाच्या शो साठी आपली जागा निश्चित करण्यासाठी ९४२३६८६१६५ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. मुलांना नेण्या आणण्याची जबाबदारी पालकांची राहील. हा चित्रपट पाहण्यासाठी आगावू नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!