*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळातील शिवाजीनगरचे छत्रपती शिवाजी महाराज नामांतरचा ठराव*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ शहरामधील शिवाजीनगर या भागाचे नामांतर व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती.त्यानुसार या भागाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामांतर करण्याचा ठराव आज घेण्यात आला.त्याबद्दल नवनिर्वाचित कुडाळ नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर आणि महायुतीचे नगरसेवक यांचे शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटने तर्फे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

