सावंतवाडीत संत रविदास जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडीत संत रविदास जयंती उत्साहात साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडीत संत रविदास जयंती उत्साहात साजरी*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्या वतीने संत रोहिदास यांची ६४७ जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सावंतवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देविदास बोर्डे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा .बोर्डे यांनी संत परंपरेचा इतिहास सांगून संत रविदास यांनी सहाव्या शतकात भक्तीचे व्रत अंगीकारून राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणते कार्य केले हे स्पष्ट केले. मंदिर, मज्जित एकच आहे, असा संदेशही त्यांनी दिला आणि समाज जोडण्याचे काम केले हे त्यांनी स्पष्ट केले . आपल्या अनुयायांना गुलामीत राहू नका, असा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगून माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो हे स्पष्ट केले.

यावेळी समितीचे अध्यक्ष केशव जाधव, परशुराम चव्हाण, शांताराम असंनकर, सुरेश जाधव वआंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!