*कोंकण एक्सप्रेस*
*ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग मार्फत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग चे सचिव श्री. बाबली गवंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवार दि. ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. चौगुले यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी संस्थेच्या रक्तदान क्षेत्रात करीत असलेल्या कार्याचा गौरव केला व आपण सर्वजण छान काम करीत आहात. आमचे आपल्या संस्थेस नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले, यामध्ये आपल्या “ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” चे अध्यक्ष आदरणीय दयानंदजी गवस सर व पीएसआय सतिशजी कविटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या “पोलिस करीयर अॅकॅडमी, सावंतवाडी” मधील तीन युवती व आठ युवकांसहीत गौरी फटनाईक आणि एका महिला रक्तदात्रीने रक्तदान केले. तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे, मंगेश माणगावकर, पतंजली सहयोग शिक्षक नारायण सावंत यांच्यासहीत अमोल परब, प्रशांत मेस्त्री तसेच नामदेव कदम इत्यादींनी रक्तदान केले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. चौगुले सर, ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अटक, प्रशांत सातार्डेकर, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, सौ. प्रिया गावडे, सौ. केनवडेकर, रविंद्र प्रभुदेसाई, संतोष वैज, सेवानिवृत्त पीएसआय सतिशजी कविटकर, अॅकॅडमी प्रशिक्षक अक्षय मोर्ये, ओंकार गवंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. बाबली गवंडे यांनी व प्रास्ताविक कार्यकारिणी सदस्य श्री. दिनेश गावडे यांनी केले तर आभार संस्थेचे खजिनदार श्री. सिद्धार्थ पराडकर यांनी मानले.