*कोंकण एक्सप्रेस*
*आर.जे.पवार यांची देवगड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नियुक्ती*
*कणकवली: प्रतिनिधी*
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड मध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर कार्यरत असणारे आर जे पवार यांची देवगड तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. आर जे पवार हे लोकाभिमुख सेवा देणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कणकवली तालुक्यामध्ये नायब तहसीलदार, तहसीलदार या पदावर सेवा देताना त्यांनी जनतेची कामे करत आपली जनमानसामध्ये एक वेगळी छाप उमटवली होती. त्यानंतर त्यांची देवगड येथे बदली झाली होती. व देवगड येथून श्री पवार हे अंधेरी उपनगर या ठिकाणी बदलीने गेले होते. मात्र पुन्हा त्यांची देवगड तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.