फोंडाघाट महाविद्यालयात इतिहास प्रश्नमंजुषा संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात इतिहास प्रश्नमंजुषा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयात इतिहास प्रश्नमंजुषा संपन्न*

*कणकवली : प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे इतिहास विभागामार्फत सह्याद्री इतिहास प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम संपन्न झाला. हिरोडोटस, रोमिला थापर, धर्मानंद कोशंबी आणि समुद्रगुप्त पाटील चार गटात प्रश्नांच्या चार फेरीमध्ये ही प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

इतिहास विषयावर आधारित ही प्रश्नमंजुषा होती त्यात रोमिला थापर या गटातील कु.कोमल जोईल व कु.साक्षी परब या विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विजेतेपद पटकावले तर हिरोडोटस या गटाने उपविजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत शुभम लाड, प्रसाद लाड, कु. कोमल जोईल, कु.साक्षी परब, कु.अक्षता लाड, कु.विशाखा ढवण, ओंकार गुरव, दयेश मेजारी ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर परीक्षक म्हणून डॉ. सतीश कामत व प्रा. विनोदसिंह पाटील यांनी काम पाहिले.

या प्रसंगी बोलतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची आवश्यकता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून असे उपक्रम स्तुत्य आहेत. इतिहासा प्रति विद्यार्थी जागरूक राहिला पाहिजे त्यामुळे आपल्या इतिहासाची माहिती होते व विद्यार्थी सजग होतो.

हा कार्यक्रम पार पाडण्याची इतिहास विभाग प्रमुख लेफ्ट.डॉ.राज ताडेराव यांनी प्रचंड मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुचिता कदम व कु.विद्या चव्हाण या विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!