आम.दीपक केसरकरांचा डेगवे देवस्थान समितीकडून सत्कार

आम.दीपक केसरकरांचा डेगवे देवस्थान समितीकडून सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*आम.दीपक केसरकरांचा डेगवे देवस्थान समितीकडून सत्कार*

*बांदा : प्रतिनिधी*

माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांचा डेगवे येथे देवस्थान समितीकडून सरपंच राजन देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उत्तम देसाई, माजी सरपंच प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, सिताराम देसाई, सूर्याजी देसाई विजय देसाई, सौ. वैदेही देसाई, आबा देसाई, सुभाष देसाई, गुरुनाथ सावंत आदीसह देवस्थानाचे मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले की, डेगवे गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहोत. अनेक कामे प्रस्तावित असून विकासकामांसाठी अधिकाधिक प्रस्ताव आपल्याकडे सादर करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!