*कोंकण एक्सप्रेस*
*मणेरी पुलावर दोन दुचाकींच्या धडकेत ३ गंभीर जखमी*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग ते बांदा मार्गावर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मणेरी पुलावर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने झालेल्या या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याना तातडीने दोडामार्ग रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलविण्यात आले. या दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी दोडामार्ग पोलीस तपास करत आहेत.
झालेल्या या अपघातात संदेश सोनू जंगले सासोली, जखमी झाला. संदीप श्रीकांत सावंत, कुडाळ ,सुरज अनंत धोंड, रा. शिरशिंगे हे तिन्ही गंभीर जखमी झाले. मणेरी सासोली येथील स्थानिकानी त्यांना तातडीने दोडामार्ग रूग्णालयात १०८ बोलावून दखल केले.तर संदीप सावंत या युवकास बांबोळी गोवा येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले.

