फोंडा राधानगरी घाटात मल्टिएक्सल गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक

फोंडा राधानगरी घाटात मल्टिएक्सल गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडा राधानगरी घाटात मल्टिएक्सल गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक*

*शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिका-यांचे वेधले लक्ष; कारवाईची केली मागणी*

*कणकवली : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कणकवली तालुक्यातून अवजड वाहनाने ओव्हरलोड व विना परवाना वाहतूक चिरे, वाळू, सिलीका मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्यामुळे एकमेव कोल्हापूरला जोडणारा फोंडा राधानगरी रस्ता नादुरुस्त झालेला आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे अॅम्बुलन्स मधून पेशंटला नेताना पेशंटची वाहतूक अवघड झालेली आहे. कारण ओव्हरलोड व मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे फोंड्यापासून राधानगरीपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त झालेला आहे. या नादुरुस्त रस्त्यावरती होणाऱ्या वाहतूकीला सर्व वाहनांना एलईडी लाईट वापरून समोरून येणाऱ्या छोट्या वाहनांना अवघड बनले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याचा आरोप शिवसेना, माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला आहे.

फोंडा राधानगरी घाटमार्गे वाहतूक होत असल्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी आंदोलन केल्यामुळे प्रांतकार्यालय कणकवली यांनी २४ तास आपल्या फोंडा चेकनाक्यावरती भरारी पथक व मंडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या काळात काही काळ नियंत्रण आले होते. पण आता मालवण तळाशील कालावल खाडीतून वाळू त्याचप्रमाणे या भागातील विविध ठिकाणी असलेल्या चिरेखाणी यांची कोल्हापूर बेळगाव आचरा मार्गे कणकवली फोंडा राधानगरी येथे ओव्हरलोड विनापरवाना वाहतूक करून कणकवली पोलीस स्टेशन आणि कणकवली तहसीलदार व प्रांतकार्यालयाचा हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असते. त्याकडे महसूल यंत्रणा पूर्णतः दुर्लक्षित किंवा आर्थिक देवाण-घेवाण करून वाहतूक सुरु ठेवत आहे. तरी यावरती नियंत्रण न आल्यास फोंडा घाटाच्या चेकनाक्यावर शिवसैनिक व नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!