वेताळ प्रतिष्ठानतर्फे १५ फेब्रुवारीला रक्तदान शिबीराचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठानतर्फे १५ फेब्रुवारीला रक्तदान शिबीराचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेताळ प्रतिष्ठानतर्फे १५ फेब्रुवारीला रक्तदान शिबीराचे आयोजन*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि सहयोगी संस्थांच्या आणि कै. गुरुदास तिरोडकर मित्रपरिवार यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन १५ फेब्रुवारीला उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९ .०० वाजता केले आहे.

वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग २८ वे रक्तदान शिबीर असून या शिबिरासाठी सिध्दार्थ कलाविष्कार युवक मंडळ, तुळस, आनंदयात्री वाड.मय मंडळ वेंगुर्ले, श्री देवी शारदा प्रतिष्ठान रामघाट-वेंगुर्ले, बालगोवर्धन कला-क्रीडा मंडळ तुळस-राऊळवाडा, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या सहयोगी संस्था असून रक्तपेढी सावंतवाडी आणि रक्तपेढी एस.एस.पी. एम. पडवे यांच्या सहकार्याने सदर शिबीर होत आहे. सर्व रक्तदात्यांचा गुरुदास तिरोडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महेश राऊळ – ९४०५९३३९१२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!