*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट हरकुळ श्रृंगेश्वर माघी श्री.गणेश जयंती उत्साहात साजरी*
*कणकवली : प्रतिनिधी*
तालुक्यातील फोंडाघाट हरकुळ येथील श्रृंगेश्वर मंदिरात माघी श्री.गणेश जयंती उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शिंगोबा डोंगराच्या खाली हे जागृत मंदिर सर्वांचे श्रध्दास्थान आहे. दुपारी श्री.गणेश जन्म १२ .०० वाजता झाला.हजारो भाविकांनी यानिमित्ताने दर्शनाचा लाभ घेतला.त्यानंतर पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जवळ जवळ ३ ते ४ हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.