शिवसेना उबाठा गटाचे दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

शिवसेना उबाठा गटाचे दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

*कोकण एक्सप्रेस*

*शिवसेना उबाठा गटाचे दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण*

*दोडामार्ग : शुभम गवस*

बेकायदेशीर खडीक्रशर,बेभान ओव्हर लोड खडी वाहतूक आणि त्यात सामील मुजोर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग या गटाने  दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला २६ जानेवारी रोजी सुरुवात झाली.कडाक्याच्या थंडीतही हे उपोषण चालू होते.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही ,असे उपोषणकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे.उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता.विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तसेच सावंतवाडी उपजिल्हा प्रमुख कासार यांनी आज या उपोषणास  भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!