मणेरी देऊळवाडी रस्त्याचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार

मणेरी देऊळवाडी रस्त्याचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार

*कोंकण एक्सप्रेस*

*मणेरी देऊळवाडी रस्त्याचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार*

*प्रजासत्ताक दिना दिवशी उपोषणाला बसणार भगवान गवस आणि ग्रामस्थांनी दिला इशारा*

*दोडामार्ग  ः शुभम गवस*

सन २०१९/२० मध्ये मणेरी देऊळवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक मधून रस्ता रूंदी करण खडीकरण, डांबरीकरण, यासाठी १ कोटी पाच लाख रुपये मंजूर झाले. संबंधित ठेकेदार याने बोगस काम केले यामुळे या ठिकाणी बांधलेली मोरी कोसळली होती. काही भाग वाहुन देखील गेला होता.
गावात मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांची कामे ही सदर कामाची मुदत संपली तरी संबधित ठेकेदार यांनी पूर्ण केली नाही. यामुळे उघडलेल्या तसेच खड्डे पडलेल्या रस्त्यावर जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. मणेरी देऊळवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मधून मंजूर झालेला रस्ता पाच वर्षे झाली तरी ठेकेदार याने अपूर्ण ठेवून पळ काढला आहे. आठ दिवसात रस्ता काम पूर्ण केले नाही तर २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा भगवान गवस व इतरांनी दिला आहे.
रिक्षा मोटार सायकल इतर वाहने ग्रामस्थ याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संबंधित अधिकारी यांनी आठ दिवसात मणेरी देऊळवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता काम सुरू करून पूर्ण केले नाही तर २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा भगवाव गवस ग्रामस्थ यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!