*कोंकण एक्सप्रेस*
*निगुडे सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांचा अजब कारभार सकाळी ०३:०० वाजल्यापासून आमचा गाव आमचा विकास खास ग्रामसभेचा आयोजन*
*बांदा : प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निगुडे सरपंच यांनी आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सन 2025 26 विकास आराखडा तयार करणे संदर्भात बैठकीचे आयोजन केले परंतु सदर बैठका या वंचित घटक महिला सभा बालसभा व सर्व ग्रामस्थांची ग्रामसभा या खास ग्रामसभेचे आयोजन केलं परंतु सकाळी लवकर सर्व सभा लावण्यात आल्या व गावातील वाडीतील प्रत्येक नोटीस बोर्डवर सभा लावत असताना सकाळी असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांना या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे सरपंच निगुडे व ग्रामसेवक यांच्या सदर अजंठावर हस्ताक्षर आहेत गावात एकच चर्चा की सरपंच झोपेत सही करतात की काय

