कणकवली बसस्थानकावरील दुचाकी अज्ञाताने केली लंपास

कणकवली बसस्थानकावरील दुचाकी अज्ञाताने केली लंपास

*कोंकण Express*

*कणकवली बसस्थानकावरील दुचाकी अज्ञाताने केली लंपास*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली शहरातील एसटी बसस्थानकाजवळ उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही चोरी २१ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ ते २२ नोव्हेंबरच्या सकाळी साडेसात वाजण्याच्या कालावधीत झाली आहे. याबाबत दत्तप्रसाद राघू कोरगावकर वय ३५, मूळ राहणार साळगाव, सध्या राहणार कणकवली विद्यामंदिरजवळ  यांनी तक्रार दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, कणकवली शहरातील पेट्रोल पंपानजीक पुलाखाली बसस्थानकासमोर आपले कापड दुकान आहे. कापड दुकानाच्या बाजूला दुचाकी (क्रमांक एमएच ०७- एडी ९३२६) उभी करून ठेवली होती. त्यानंतर आपण साळगाव या मूळ गावी गेलो होतो. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी जागेवर उभी नव्हती. कुणीतरी अज्ञाताने ती चोरून नेली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही अद्याप ती मिळालेली नाही. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस हवालदार विनोद सुपल करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!