दुचाकींच्या धडकेत कळसुलीचा युवक जखमी

दुचाकींच्या धडकेत कळसुलीचा युवक जखमी

 

*कोंकण Express*

*दुचाकींच्या धडकेत कळसुलीचा युवक जखमी*

*कणकवली : प्रतिनिधी*

कळसुली येथील सोहम संतोष दळवी वय १९ हा युवक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.

त्या जखमी युवकावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भरतभाई वसरामभाई भोजिया (४३, रा. कलमठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोहम दळवी याने पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मराठा मंडळ येथे मित्राला सोडून आपली दुचाकी (क्रमांक एम.एच.०७ ए.टी.८०३५) घेऊन पुन्हा शहराकडे येत होतो. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाखाली गोव्याच्या दिशेने येणाऱ्या भरतभाई वसरामभाई भोजिया यांची दुचाकी (क्रमांक एम. एच.०७ ए.एम.५७२७) ही धडकली. या अपघातात सोहम दळवी याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!