शिवसेना उबाठा पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक

शिवसेना उबाठा पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक

*कोंकण Express*

*शिवसेना उबाठा पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक*

*कणकवली : प्रतिनिधी*

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तरी या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, शिवसेना शहरप्रमुख, महिला शहरप्रमुख, युवासेना शहरप्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख व उपविभागप्रमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख मागास सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा चिटणीस, अनुसूचित जाती सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा सरचिटणीस, युवासेना व महिला उपजिल्हाप्रमुख, महिला व युवासेना शहरप्रमुख, महिला व युवासेना उपतालुकाप्रमुख, महिला व युवासेना विभागप्रमुख, निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!