*कोंकण Express*
*शालेय जीवनापासून खेळाचा पाया पक्का करा* – सागर जाधव*
*सिंधुदुर्गनगरी येथे शालेय जिल्हास्तरीय’ वुशू’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्नं पहा त्यासाठी शालेय जीवनापासून आपल्या आवडत्या खेळाचा पाया पक्का करा आणि टार्गेट ऑलिंपिकचे ठेवूनच मार्गक्रमण करत रहा निश्चितच आपल्या देशाचा तिरंगा फडकवण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल असा आशावाद बँक ऑफ महाराष्ट्र ओरोस शाखेचे मुख्य व्यवस्थापक सागर जाधव यांनी सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सागर जाधव बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,वुशु पंच शहाजी गोफणे, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक व पंच दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी व पंच बाळासाहेब ढेरे, प्रशिक्षण सोनु जाधव( कासार्डे), कार्यालयीन कर्मचारी सिध्दांत रायकर ,मंगेश माने,
पंच सोहम घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला सागर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांनी स्वागत केले.
*खेळात संस्कार महत्त्वाचे असतात* – राहुल गायकवाड
याप्रसंगी बोलताना क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले की, कोणताही खेळ असू द्या खिलाडीवर तुम्ही खेळला जावा आणि त्या खेळाचे संस्कार खेळाडूंमध्ये रुजणे गरजेचे असून तरच तो खेळाडू परिपूर्ण खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो अशी प्रतिपादन नुतन क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांनी खेळूडांना मार्गदर्शन करताना केले.
उद्घाटन सोहळ्याचे प्रस्ताविक शहाजी गोफणे यांनी करताना वुशु खेळाविषयी सखोल माहिती दिली..
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय मारकड यांनी केले तर आभार बाळासाहेब ढेरे यांनी मानले. या स्पर्धेला १७ व १९ वर्षाखालील गटातील वैभववाडी,देवगड व कणकवली तालुक्यातील खेळाडूंनी हजेरी लावली होती.या शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत मुलींच्या गटातून कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तर मुलांच्या गटातून कुणकेश्वर माध्यमिक विद्यालय आघाडी घेतली होती.