सावंतवाडीचा क्रीडा वारसा जपण्यासाठी” फुटबॉल क्लब”ची घोषणा.

सावंतवाडीचा क्रीडा वारसा जपण्यासाठी” फुटबॉल क्लब”ची घोषणा.

*कोकण Express*

*सावंतवाडीचा क्रीडा वारसा जपण्यासाठी” फुटबॉल क्लब”ची घोषणा…*

*संदिप गावडेंचा पुढाकार; “माई हिरण्यकेशी” उपक्रमातून संवर्धन आणि खोलीकरण…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

संस्थानकालीन पार्श्वभूमी लाभलेल्या सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपण्यासाठी
भाजपाचे युवा नेते संदिप गावडे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर “एफ.सी” सावंतवाडी या असोशिएशनची घोषणा करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी नुसती स्पर्धा घेवून न थांबता येथे नव्याने खेळाडू घडावेत यासाठी “एफ.सी” सावंतवाडीच्या माध्यमातून या ठिकाणी शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे हिरण्यकेशीचे संवर्धन करण्याचा आमचा हेतू असून या कामाला माई हिरण्यकेशी संवर्धन या उपक्रमांअंतर्गत सुरूवात करण्यात आली आहे, त्याला आता संबंधित गावातील ग्रामस्थांनी अंतिम स्वरूप द्यावे हिरण्यकेशचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे संदिप गावडे यांनी आवाहन केले.
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या क्लबची घोषणा करण्यात आली. यावेळी श्री. गावडे यांनी या मागणी भूमिका विषद केली ते म्हणाले, या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फक्त स्पर्धा घेवून न थांबता या पुढे ही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जावेत तसेच नवोदीत खेळाडू घडविण्यासाठी सावंतवाडी फुटबॉल क्बलची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा आता सावंतवाडीसह जिल्ह्यातील खेळाडुंना करुन देण्यात येणार आहे. या ठिकाणी तंत्र आणून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी श्री.गावडे पुढे म्हणाले, आंबोेली येथून कोल्हापुर कडे जाणार्‍या हिरण्यकेशी या नदीचे संवर्धन आणि खोलीकरण करण्याचा निर्णय आम्ही मागच्या वर्षी घेतला. स्वखर्चाने आणि लोकसहभागातून आंबोली-गावठाणवाडी आणि कामतवाडी या परिसरातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे दरवर्षी येणारे पाणी या वर्षी मात्र त्या ठिकाणी आले नाही. त्यामुळे लोकांचे होणारे नुकसान थांबले. आता ही मोहीम अगदी कोल्हापूुर पर्यंत राबविण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेणार आहोत.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, माजी तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, राजू राऊळ, निलेश तेंडोलकर, विनय केनवडेकर, श्रीपाद तटवे, संदिप हळदणकर, दिलीप भालेकर, समर्थ राणे परिक्षीत मांजरेकर, गुरूनाथ कासले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!