दळवटणे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान

दळवटणे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान

*कोकण Express*

*दळवटणे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान*

*चिपळूण*

तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील शेतातील फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाचे बचाव पथकाने सुखरूप बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात मुक्त केले. ही घटना
काल शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजी घडली.

दळवटणे भुवडवाडी येथील संतोष तु. भुवड व धोंडू तु. भुवड यांच्या शेतामध्ये फासकीत बिबटया अडकला असल्याची माहिती संदीप यशवंत सुखदरे यांनी दूरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. सदरची माहितीच्या अनुषंगाने वनविभागाचे बचाव पथक रेस्क्युसाठी आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले व सदर बिबट्यास काही वेळातच सुखरूप बाहेर काढले. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे यांनी पाहणी केली असता त्यांनी सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ३.५ वर्षे असून तो सुस्थितीत असल्याचे सागितले. त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबतचा अहवाल दिला. त्यानुसार वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.वन विभागाचे बचाव पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती राजेश्री कीर, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक राजाराम शिंदे, वनरक्षक कृष्णा इरमले व वाहनचालक नंदकुमार कदम यांनी सक्रिय कामकाज करत बिबट्याला केवळ अर्ध्या तासामध्येच स्थानिक ग्रामास्थांच्या मदतीने बाहेर काढले.या बचाव पथकास विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!