*कोकण Express*
*सालाबाद प्रमाणे फोंडाघाट बिजलीनगर येथे सत्यनारायण महापूजा व विविध सामाजिक, संस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक २६जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी यंदाही फोंडाघाट बिजलीनगर येथे सत्यनारायण महापूजा व विविध सामाजिक, संस्कृतीक, आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री सत्यनारायण पूजा दुपारी १२.३०ते३.३०महाप्रसाद, संध्याकाळी ४वा. महिलांची फुगडी, संध्याकाळी ७ वा.भजन नारायणी प्रस्तुत स्वामीगंध, राधानगरी, रात्री ठीक ९ वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ यांचे ट्रिकसीन नाट्यप्रयोग अजिंक्यतारा भाग दोन हा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या सर्व सोहळ्याचे तसेच नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी तरुण मंडळ फोंडाघाट यांनी केले आहे .