उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती युवा उद्योजक पुरस्कार

उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती युवा उद्योजक पुरस्कार

*कोकण Express*

*उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती युवा उद्योजक पुरस्कार*

*मुंबई एकदा कल्चर अकादमीतर्फे सन्मान*

*अभिनेते – गायक नागेश मोरवेकर यांच्या हस्ते १४ जानेवारी रोजी गौरव*

*कणकवली/ प्रतिनिधी*

मूळ बावशी रहिवासी आणि सध्या मुंबई येथे व्यवसायानिमित्त कार्यरत असलेल्या युवा उद्योजक रवींद्र मर्ये यांना एकता कल्चर अकादमी मुंबईतर्फे देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली
एकता कल्चर अकादमीतर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील युवा उद्योजकाची प्रबोधक ठाकरे युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड समितीतर्फे निवड केली जाते. यासाठी प्रस्ताव मागितले जात नाहीत. समितीतर्फे माहिती घेऊनच हा पुरस्कार दिला जातो. 2022 च्या सदर पुरस्कारासाठी मुंबई येथे क्लिक टेक्नॉलॉजी या उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या रवींद्र मर्ये यांची सदर पुरस्कारासाठी एक मताने निवड करण्यात आली. या निवड समितीत अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव प्रकाश पाटील आणि अकादमीचे सल्लागार कवी अजय कांडर आदींचा समावेश होता.
शनिवार 14 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघात एकता कल्चर अकादमीचा विविध पुरस्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि गायक नागेश मोरवेकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराने श्री मर्ये यांना गौरविण्यात येणार आहे. रवींद्र मर्ये हे बावशी सारख्या छोट्या खेडेगावात राहून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत नोकरीसाठी ते मुंबईला गेले. प्रारंभी काही दिवस नोकरी करून त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला प्रारंभ केला. आज क्लिक टेक्नॉलॉजी या व्यवसायात भरारी घेतली असून कोविड काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी विविध ठिकाणी सॅनिटायझेशन मशीन मोफत उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या सन्मानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!