*कोकण Express*
*कलमठ प्रभाग चार मधील ग्रामपंचायत सदस्या तनिष्का तेजस लोकरे यांच्याकडून सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ सरपंच पदी निवडून आलेले संदीप मेस्त्री व उपसरपंचपदी पदभार स्वीकारलेले स्वप्निल चिंदरकर यांचा ग्रामपंचायत सदस्या तनिष्का लोकरे व तेजस लोकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संदीप मेस्त्री यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवारापेक्षा मोठे मताधिक्य मिळवल्याने सर्व सदस्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप मेस्त्री हे सदस्य पदासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, स्वप्नील चिंदरकर यापूर्वीही उपसरपंच होते त्यावेळी त्यांनी गावच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आपली जबाबदारी पार पाडली त्यामुळे ही संधी पुन्हा त्यांना प्राप्त झाली तसेच गावच्या विकासासाठी सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य एकजूट होऊन कामे मार्गी लावू असे नवनिर्वाचित सदस्या तनिष्का लोकरे यांनी सांगितले.