*कोकण Express*
*गावचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या खा विनायक राऊत*
*विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांचे खासदार राऊत यानी केलें पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
नेमळे ग्रामपंचायतीच्य
नेमळे ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेना सरपंच आणि आठ सदस्य मिळून एक हाती सत्ता नीवडून आल्याने शिवसेना खासदार विनायक राऊत यांची त्याच्या निवासस्थानी नेमळे गावातील शिवसैनिकानी भेट घेतली यावेळी खासदार विनायक राऊत यानी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी खास करुन शिवसेना तालुका प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांचे खासदार राऊत यानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
खासदार विनायक राऊत म्हणाले,तुमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला विकास आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहावे. सरपंचांनी हवामान आधारित विमा योजना लागू करण्याचा प्रश्न पहिल्या भेटीत आणला आहे. तो सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मांडणार आहे तसेच तो प्रश्न हाताळून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
यावेळी शिवसेना नवनिर्वाचीत नेमळे ग्रामपंचायत सरपंचा सौ.दिपिका दिलीप भैरे ,सदस्य श्री . सखाराम शिवराम राऊळ , श्री .एकनाथ गंगाराम राऊळ, श्री .सिध्देश आनंद नेमळेकर श्री ,सागर सदाशिव नेमळेकर सौ.,स्नेहाली सुभाष राऊळ,श्रीम.शितल