*कोकण Express*
*कोकण विभागात वर्षात ८४ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस*
टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय कोणतेही सरकारी काम होत नाही, असा प्रत्यय नागरिकांना वेळोवेळी येतो. यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. कोकण विभागात १ जानेवारी ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान लाचखोरी, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ८४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोकण विभागाचा विचार केल्यास सर्वात कमी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केवळ ३ प्रकरणात सापळे रचित कारवाई केली असून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३७ सापळे तसेच २ अपसंपदा प्रकरणात कारवाई केली आहे. तर रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ प्र्रकरणात सापळे रचित लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहे.
भ्रष्टचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. परंतू लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढत चालली आहे. बहुसंख्य सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. तसेच अनेकजण त्वरित शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देवून मोकळे होतात. यामुळे भ्रष्टाचार वाढत चालला आहे.