बापर्डे येथे दारूधंद्यावर छापा ८६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त

बापर्डे येथे दारूधंद्यावर छापा ८६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त

*कोकण Express*

*बापर्डे येथे दारूधंद्यावर छापा ८६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त*

*स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई*

*देवगड ः प्रतिनिधी*

सिंधुदूर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने बापर्डे रेडेटाका येथील तुकाराम सिध्दू झोरे(६५) यांच्या दारू धंद्यावर छापा टाकून ८६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.ही कारवाई मंगळवारी दुपारी १२.४५ वा.सुमारास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बापर्डे रेडेटाका येथील तुकाराम सिध्दू झोरे(६५) हे अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचा उद्देशाने बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार मंगळवारी दुपारी १२.४५ वा.सुमारास गुन्हा अन्वेषण विभागाचे पो.हे.कॉ.राजू जामसंडेकर, रवि इंगळे, गंगावणे, खाड्ये या टीमने बापर्डे रेडेटाका येथे तुकाराम झोरे यांच्या येथे छापा टाकून त्यांच्या ताब्यात असलेली ८६०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली.अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचा उद्देशाने बाळगल्याप्रकरणी झोरे यांच्याविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!