अटल रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर

अटल रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर

*कोकण Express*

*अटल रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर*

*अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त बांदा शहर भाजपचे आयोजन*

*बांदा ः प्रतिनिधी*

माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर झाला आहे. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हाभरातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – रंगभरण स्पर्धा – (बालवाडी ते दुसरी) प्रथम सई सुभाष दळवी, द्वितीय रिदीत राकेश गावडे, तृतीय ओम विठ्ठल सावंत, उत्तेजनार्थ समर्थ संदीप नार्वेकर. (तिसरी ते पाचवी) प्रथम तईबा सलीम शहा, द्वितीय अन्वयी आशिष पवार, तृतीय मयुरेश महेश हवालदार, उत्तेजनार्थ मित राजेश विर्नोडकर व नविका दिवाकर मावलंकर. (सहावी ते आठवी) प्रथम चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, द्वितीय प्राची मनोहर गवस, तृतीय निधी सुनील राठोड, उत्तेजनार्थ प्राप्ती प्रवीण प्रभू व गीत सागर बहुलीकर.

चित्रकला स्पर्धा – (खुला गट) प्रथम तन्वी सूर्यकांत कुडव, द्वितीय समी सूरज राऊळ, तृतीय अरविंद आशुतोष भांगले, उत्तेजनार्थ समर्थ हनुमंत शिरोडकर.

पारितोषिक वितरण सोहळ्याला माजी जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, आबा धारगळकर, श्रेया केसरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सुनील राऊळ, केदार कणबर्गी, अमित घोंगडे, शैलेश केसरकर, सिद्धेश पावसकर, प्रवीण नाटेकर, सर्वेश मुळ्ये, उमांगी मयेकर, सुधीर शिरसाट, सिंधीया पावसकर, प्रिया नाटेकर, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण केदार  कणबर्गी व मनोज गुळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रिया नाटेकर यांनी तर आभार बाबा काणेकर यांनी मानले. विजयी स्पर्धकांनी प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक साठी आबा धारगळकर (९४२२३८८२४८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!