*कोकण Express*
*प्रत्येक शिवसैनिक भाजपच्या प्रवृत्तीच्या विरोधात लढला-शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर*
*आमिषाला बळी न पडता ताकत, चिकाटी जिद्दीने लढला..*
देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेनेने अतिशय कठीण काळात चांगल यश प्राप्त केलं आहे. तालुक्यात निवडून आलेले शिवसेनेचे सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार आज देवगड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर ,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच आणि सदस्य यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले की, गेल्या पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेवर आघात झालेला आहे .उद्धव ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केलं.त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हाव लागले. म्हणून त्याच दिवसापासून या राज्यातील शिवसेना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शिवसेना संपविण्याच कटकारस्थान रचलं गेलं त्यामुळे शिंदे गट नावाचा गट स्थापन केला गेला.इकडे आपण भाजपच्या विरोधात आपण लढतोय एकीकडे राणे भाजप आणि शिंद गटाच्या विरोधात लढतोय .प्रचंड आमिष आणि पैसेच वाटप तसेच खोट्या विकासाची जबाबदारी असेल अशी अनेक आमिष दाखवलं जात आहे शिवसेनेला निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे
देवगड तालुक्यातील तमाम शिवसैनिकांचं मनापासून कौतुक करेन आणि मनापासून त्यांना धन्यवाद देईन एवढी शिवसेनेची पडझड होत असताना सुद्धा अनेक प्रकारची अमिषा दाखवली गेली असताना सुध्दा त्याला माझा शिवसैनिक बळी पडला नाही सच्चा निष्ठेने आजही शिवसेनेबरोबर आहे आज जे तुम्ही या मतदारसंघांमध्ये यश मिळवला आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे प्रत्येक कार्यकर्त्याने माझ्या गावातील माझ्या घरातील लढाई आहे शिवसेनेच्या नेतृत्वाची लढाई आहे की लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालात
ग्रामपंचायतचे उमेदवार ठरवत असताना किंवा फॉर्म भरत असताना खरंतर त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक त्रास झाला घरपट्टी, पाणी पट्टी भरली निवडून येणारे योग्य उमेदवार शोधलेत या रणांगणामध्ये आणि या प्रवृत्तीच्या विरोधात लढून निवडून सुद्धा आपण आलात त्यामुळे शिवसेना या संघटनेला चांगली च मतदारसंघातून बळकटी मिळाली आहे.