शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

*कोकण Express*

*शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान…*

*सदस्य व पॅनल प्रमुखांचे आभार*

*खारेपाटण ः प्रतिनिधी*

खारेपाटण येथील शिंदे गटातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सौ प्राची इस्वलकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सदस्यांसह पॅनलप्रमुखांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. खारेपाटण येथील ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला निवडून दिल्याबद्दल आम्ही त्यांच्यें आभार मानतो तसेच गावाच्या विकासासाठी झटून काम करू असे सरपंच सौ ईस्वलकर यांनी संबोधले.
खारेपाटण येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उप महिला जिल्हाप्रमुख सौ संजना हळदिवे, उप महिला जिल्हाप्रमुख नीलम शिंदे, कुडाळ महिला उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, गुरुप्रसाद शिंदे, मंगेश गुरव, तृप्ती पाटील, अस्थाली पवार, निदान मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!