*कोकण Express*
*४ डिसेंबर रोजी कासार्डेत ज्युदो निवड चाचणीचे आयोजन*
*कासार्डे ;संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्हा जुदा असोसिएशन मार्फत
दि.४ डिसेंबर २०२२रोजी स.९.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युनिअर गटाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी या निवड चाचणीला उपस्थित राहावे.
खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेला सहभागी होण्यासाठी
*१)मुळ जन्मदाखला व तीन झेरॉक्स*
*२) मुख्याध्यापक सहीनिशी शाळेच्या लेटरहेड वर फोटो सह खेळाडुचे माहिती असलेले पत्र*
*३),मुळ आधारकार्ड आणि तीन झेरॉक्स*
हे तीनही दाखले अनिवार्य आहे याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी घ्यावी.तसेच खेळाडुंनी सोबत तीन आयडी फोटो घेऊन यावे.
ज्यांची जन्मतारीख २००२ते २००७ मध्ये आहे यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल.
*१८वर्षाखालील खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांचे संमत्तीपत्र जिल्हा संघटनेकडे देणे अनिवार्य आहे.अन्यथा संबंधित खेळाडूंना या निवड चाचणीत खेळता येणार नाही याची नोंद घ्यावी.*
तरी जिल्ह्यातील इच्छुक ज्युदो खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड आणि अभिजीत शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.