कासार्डे ज्यु.कॉलेजचा ऋषिकेश कुडतरकर बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता*

कासार्डे ज्यु.कॉलेजचा ऋषिकेश कुडतरकर बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता*

*कोकण Express*

*कासार्डे ज्यु.कॉलेजचा ऋषिकेश कुडतरकर बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता*

*जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*कासार्डे: संजय भोसले*

क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ.१२वी सायन्स चा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर यांने 19 वर्षे वयोगटात खेळताना कणकवली तालुकास्तरावर उपविजेते पटकावले असून, त्याची कनेडी ता. कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तो त्या ठिकाणी कणकवली तालुक्याचे नेतृत्व जिल्हास्तरावर करणार आहे. तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर कणकवली येथे पार पडली.
या यशस्वी खेळाडूंला बुध्दिबळ मार्गदर्शक अवधूत कानकेकर, ऋषिकेश खटावकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, अनिलकुमार जमदाडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
ज्ञया यशस्वी खेळाडूचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,सर्व पदाधिकारी,शाळा समिती चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम.डी. खाडये ,पर्यवेक्षक नारायण कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!