*कोकण Express*
*जेरॉन फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस यांना स्व.जाॅन पिंटो स्मृती पुरस्कार जाहीर..!*
*सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिस्ती विकास मंडळ मुंबई कडून माहिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिस्ती विकास मंडळ मुंबई द्वारे देण्यात येणारा २०२० सालचा स्व.जाॅन पिंटो स्मृती पुरस्कार आचरा येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि. प. सदस्य श्री. जेरोन बस्त्याव फर्नांडिस यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ सालचा स्व.जाॅन पिंटो स्मृती पुरस्कार चिंदर/मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रुजाय किस्तु फर्नांडिस (आर के) यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी आचरा,डामडुल ता.मालवण सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. दोघांचेही संस्था अध्यक्ष श्री पास्कॉल लोबो,सरचिटणीस श्री विल्यम फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

