*कोकण Express*
*शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संदेश पारकर यांची सदिच्छा भेट ; सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता*
*जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येणार- संदेश पारकर*
सिंधुदुर्गातील कार्यक्षम असलेले शिवसनेनेचे नेते संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असून त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या सोबत होते. संदेश पारकर आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट असली तरी मात्र सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे कशा येतील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कसं ठेवता येईल आणि भाजपला निवडणुकीपासून कसं दूर ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे असे देखील सांगण्यात आले आहे.
शिवसेनेकडून कणकवली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उमेदवार चाचपनी सुरू केली आहे त्यामुळे कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेकडे कशाप्रकारे येतील याकडे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यात होणाऱ्या 58 ग्रामपंचायती निवडणूक पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या शिवसेनेकडे येतील असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला आहे
सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा मतदारसंघ निहाय्य ओरोस येथे बैठका देखील घेण्यात आल्या. यावेली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक,शिवसनेचे नेते संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली.जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली असून
कणकवली तालुक्यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय.तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे.यात सरपंच पदाची थेट निवडणूक होत आहे. प्रत्येक प्रभागाचे आरक्षणही निश्चित झाले आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

