*कोकण Express*
*तळेरेतील ” ती ” 4 एकर जमीन ट्रामा केअर हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयासाठी हस्तांतरित करावी*
*आ. नितेश राणेंकडे माजी उपसभापती दिलीप तळेकर, सरपंच साक्षी सुर्वे यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तळेरे ग्रामपंचायत गावात खारभूमी कार्यालय बंद अवस्थेत आहे. या कार्यालय व परिसरात 4 एकर 4 गुंठे शासकीय जागा आहे. तळेरे गावासाठी शासनाकडून मंजूर असलेल्या ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयसाठी खारभूमी कार्यालयाच्या ताब्यातील 4 एकर 4 गुंठे जागा शासनाकडून हस्तांतरित करावी अशी मागणी तळेरे प्रभागाचे माजी पं. स. सदस्य तथा माजी उपसभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी उपसभापती महेश गुरव उपस्थित होते. तळेरे गावात मागील 35 वर्षे खारभूमी कार्यालय आहे. खारभूमी कार्यालयाचे कार्यक्षेत्र किनारपट्टी भागात येते. सध्या हे खारभूमी कार्यालय बंद अवस्थेत आहे. या कार्यालयाची इमारत व परिसरात 4 एकर 4 गुंठे जमीन आहे. सदर खारभूमी कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करावे व त्या जागेवर ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय उभारावे अशी मागणी तळेरे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली आहे.

