*कोकण Express*
*माणगाव ग्रामपंचायत साठी अपक्ष निवडणूक लढवणार; अल्लाउद्दीन खुल्ली*
*गेली कित्येक वर्ष तिकीट सोडा पण कोणत्याही पक्षाने साधं विचारात ही घेतलं नाही*
*कुडाळ/ प्रतिनिधी*
18-डिसेंबरला होऊ घातलेल्या माणगाव ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक तीन मधून मी अपक्ष निवडणूक लढवणार यावर अल्लाउद्दीन (इमरान) खुल्ली ठाम असून पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले गेले कित्येक वर्ष मुस्लिम समाज हा वेगवेगळ्या पक्षाच्या पाठीशी असताना आज पर्यंत कोणत्याही पक्षाने तिकीट तर सोडाच पण साधी विचारपूसही केली नाही आणि म्हणूनच मुस्लिम समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे असल्याने या निवडणुकीत मी अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.

